पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सार्वजनिक ठिकाणी मतदार जगजागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे. विविध माध्यमांतून लोकांना मतदानासाठी जागृत केले जात आहेत. पुणे शहरात देखील याबाबत जनजागृती करण्यासाठी वेगळी पद्धत वापरण्यात आली आहे. पुणेकरांनी मतदान करावे यासाठी अनोखी लग्नपत्रिका तयार करण्यात आली आहे. ही पत्रिका आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. त्याचवेळी निवडणूक आयोग आणि सामाजिक संघटनांकडून मोहीम सुरु झाली आहे. १३ मे या दिवशी लग्नासाठी १८ वर्ष पूर्ण झालेल्या भारतीय नागरिकाला या माध्यमातून मतदानाचे आमंत्रण दिले गेले आहे.
पुण्यात सध्या एक लग्नपत्रिका व्हायरल होत आहे. या पत्रिकेमध्ये चि. मतदार आणि चि. सौ. का. लोकशाही यांच्या लग्नाची ही पत्रिका आहे. १३ मे च्या पुणे लोकसभेच्या मतदानाला येण्यासाठी ही निमंत्रण पत्रिका आहे. मतदान करण्याचे आवाहन या पत्रिकेतून करण्यात आले आहे. मतदार हा भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे. तर लोकशाही ही भारतीय संविधानाची ज्येष्ठ कन्या आहे. या दोघांचा शुभविवाह १३ मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या शुभमुहूर्तावर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोदींच्या विकासाच्या कामावर नागरिकांना विश्वास, पुणेकरांची मन आम्ही जिंकली आहेत – मोहोळ
-‘तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी आवलाद…’; अजित पवार शरद पवारांच्या निशाण्यावर
-Shirur Lok Sabha | “त्यांच्यासाठी जीवाच रान केलं, पण…” दिलीप मोहितेंचा अमोल कोल्हेंवर प्रहार