पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून धमक्यया दिल्या जात असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना भाष्य केलं आहे.
‘घड्याळाला मतदान केले नाही तर पाणी मिळणार नाही, कारखान्याला ऊस जाणार नाही’, असा मजकूर असलेली चिठ्ठी शरद पवारंनी भर सभेत वाचून दाखवली. आणि ‘अशा धमक्यांना घाबरू नका, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आता आली आहे. कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवार यांनी आज बारामती मतदारसंघातील दुष्काळी गावांची पाहणी केली. या दुष्काळाच्या मुद्द्यावरुनही शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. “जनाई-शिरसाई योजनेच्या कामाची जबाबदारी मी ज्यांच्यावर दिली होती, त्यांनी ती पार पाडली नाही. मी गेली २० वर्षे स्थानिक विषयात लक्ष घालत नव्हतो. परंतु आता लक्ष घालून मी माझी जबाबदारी पार पाडेन. बारामतीच्या जिरायत भागाने नेहमीच मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे या माझ्या माणसांचे प्रश्न सोडवणे ही माझीच जबाबदारी आहे’ असेही शरद पवारांनी सांगितले आहे.
“अनेकजण ८४, ८५ वय झाले असे म्हणतात. तुम्ही वय काढू नका, तुम्ही अजून काय पाहिले आहे?, हा गडी थांबणारा नाही. ज्या लोकांनी साथ दिली, त्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनहिताची कामे करत राहील”, अशी ग्वाही देखील शरद पवार यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Shirur Lok Sabha | “त्यांच्यासाठी जीवाच रान केलं, पण…” दिलीप मोहितेंचा अमोल कोल्हेंवर प्रहार
-“मोदी म्हणाले, मी तुमचं बोट धरुन राजकारणात आलो, मला बोटाची काळजी..”; शरद पवारांचा खोचक टोला
-“अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही”; अजित पवारांनी संजोग वाघेरेंना धरलं धारेवर
-Lok Sabha Election | ‘बारणेंचा प्रचार करणार नाही’; मावळात महायुतीच्या बैठकीत नाराजीचा सूर!