पुणे : राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला आहे, तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या महायुतीच्या बैठकीत नाराजी नाट्य बघायला मिळालं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आज एक बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीसाठी अजित पवार, चंद्रकांत पाटील, उदय सामंत यांच्यासह शहराध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीदरम्यान नाराजी नाट्य बघायला मिळालं.
आर. पी. आय. गटाचे शहराध्यक्ष यांचा नामोल्लेख आणि व्यासपीठावर बसण्यास न बोलावल्याने पदाधिकारी यांनी या बैठकीतून काढता पाय घेत नाराजी व्यक्त केली. उदय सामंत यांना या आरपीआय आठवले गटाच्या नाराजीची कुणकुण लागल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे पहायला मिळाले.
‘जोपर्यंत रामदास आठवले यांचा आदेश येत नाही. तोपर्यंत आम्ही श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार नाही’, अशी भूमिका आरपीआय गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. उदय सामंत यांनी मध्यस्थी करत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याशी शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची भेट घडवून या नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Lok Sabha Election | शरद पवारांकडून दुष्काळी गावांची पाहणी; पाणी प्रश्वावरुन भाजपला धरणार धारेवर
-लोकसभेच्या तोंडावर देशातील डॉक्टरांचा मोठा निर्णय; देशात पहिल्यांदाच होणार दबाव गट