पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष, खासदार शरद पवार हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या मैदानात उतरले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराची पहिली फेरी सुरू आहे. अशातच मतदार संघामध्ये दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये दुष्काळाचा मुद्द्यावर राजकारण चांगलेच तापणार आहे.
दुष्काळाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारवेर धरलं आहे. तसेच शरद पवार यांनी देखील बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावची पाहणी करत आहेत. यावेळी दुष्काळी गावांच्या परिस्थितीवरुन शरद पवारांनीदेखील भाजपला धारेवर धरलं आहे.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळ मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. त्यामुळे विरोधकांनी आत्तापासूनच भाजपला या पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावरून करण्यात सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये दुष्काळ, पाणी प्रश्नावरुन राजकारण तापणार आहे हे चित्र स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभेच्या तोंडावर देशातील डॉक्टरांचा मोठा निर्णय; देशात पहिल्यांदाच होणार दबाव गट
-‘गुढीपाडवा’ सण का साजरा करावा? वाचा त्यामागचं नेमकं कारण
-आढळराव पाटलांना सर्वाधिक मताधिक्य जुन्नरमधून मिळेल! आमदार बेनकेंनी सांगितलं राजकीय गणित
-मोहोळांसाठी कसब्यात भाजपची मोर्चेबांधणी, ५० हजारांचे मताधिक्य देण्याचा रासनेंनी व्यक्त केला निर्धार
-पुण्यात भाजपचा विक्रम! एका दिवसात दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’