पुणे : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. ठिकठिकाणी प्रचारही सुरु आहे. मात्र पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद काही संपेना. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी एकदिलाने काम करणं अपेक्षित होतं मात्र पुणे काँग्रेसमध्ये गटबाजी अद्यापही कायम आहे. महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची उमेदवारी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना देण्यात आली आणि काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांची नाराजी चव्हाट्यावर आली.
कसबा मतदारसंघात गुरुवारी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पुन्हा एकदा पाहायला मिळाले. केसरीवाडा येथे बैठक सुरू होण्यापूर्वीच हे नाट्य घडले. ‘ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार दिला, तेच आता मोदीविरोधक म्हणून आमच्या शेजारी बसणार असतील, तर आम्हाला हे मान्य नाही,’ असे सांगून काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने काढता पाय घेतला आहे. त्यानंतर शुक्रवारी बैठकीसाठी लावलेल्या बॅनरवर ‘नेत्याचा’ फोटो टाकला नाही, म्हणून मंडपवाल्याला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
काँग्रेसच्या या बैठकीसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर काँग्रेसचे एक नेते आणि माजी राज्यमंत्री यांचा फोटो नव्हता. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी बॅनरवर फोटो नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर मेळावा सुरू होण्यापूर्वीच कासंबंधित नेत्याच्या कार्यकर्त्यांनी मंडपवाल्याला जाब विचारला आणि त्याला मारहाण केल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुप्रिया सुळेंना पाठिंबा न देणं मंगलदास बांदलांना पडलं महागात; वंचितकडून शिरुरची उमेदवारी रद्द
-‘आता मी घड्याळ वापरत नाही, कारण आता मोबाईलमध्ये वेळ समजते’; सुप्रिया सुळेंचा अजितदादांना खोचक टोला
-‘आमच्याकडे अजून कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा…’; डॉ नीलम गोऱ्हेंचा विरोधकांना टोला
-Baramati Lok Sabha | ‘भाजपच्या जे पोटात होतं ते ओठावर आलं’; सुप्रिया सुळेंचा भाजपवर पलटवार