शिरुर : वंचित बहुजन आघाडीकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण वंचितकडून ठरवण्यात आलं होतं.
बारामती निवडणुकीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.
मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला… pic.twitter.com/xLhMymXn3o
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 6, 2024
दरम्यान, महायुतीच्या बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी इंदापूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्याला हजेरी लावली होती. मेळाव्याला जाण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी सोनाईचे प्रमुख आणि शरद पवारांचे निवटवर्तीय दशरथ माने यांची भेट घेतली. त्यावेळी मंगलदास बांदलही तिथे उपस्थित होते. यावरुनही राजकारणात अनेक तर्क लावण्यात आले.
महत्वाच्या बातम्या-
-‘आता मी घड्याळ वापरत नाही, कारण आता मोबाईलमध्ये वेळ समजते’; सुप्रिया सुळेंचा अजितदादांना खोचक टोला
-‘आमच्याकडे अजून कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा…’; डॉ नीलम गोऱ्हेंचा विरोधकांना टोला
-Baramati Lok Sabha | ‘भाजपच्या जे पोटात होतं ते ओठावर आलं’; सुप्रिया सुळेंचा भाजपवर पलटवार
-बारामतीच्या राजकारणात खळबळ; वंचितचे शिरुर लोकसभेचे उमेदवार मंगलदास बांदल फडणवीसांच्या भेटीला??