पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २ गट पडल्यानंतर बारामतीच्या विद्यमान खासदार आणि बारामतीच्या लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी खडकवासल्यात प्रचारासाठी आल्या होत्या. यावेळी सुप्रिय सुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी पक्षफुटीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शर्थ करावी लागत आहे. त्यातच सुप्रिया सुळे यांनी घड्याळ चिन्हाबाबत वक्तव्य करत तुतारीचं चिन्ह आपल्यासाठी कसं शुभ आहे. हे एका प्रचार भेटीदरम्यान सांगितले आहे.
“आमचा पक्ष काढून घेतला, त्यांना वाटलं आम्ही रडू, पण आम्ही रडणार नाही, लढणार आहोत. आता मी घड्याळ वापरत नाही. माझ्यासमोर बसलेल्या अनेक लोकांनी घड्याळ घातले नाही. कारण आता मोबाईलमध्ये वेळ समजते. त्यामुळे घड्याळाची गरज पडत नाही”, अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
“भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या जे पोटात होतं ते आता बाहेर आलं आहे. चंद्रकांत पाटील मागे बारामतीतून बोलले की, आम्हाला फक्त शरद पवारांना संपवायचं आहे, यांना काम करायचं नाही, विकास नकोय. ही ईस्ट इंडिया कंपनी पवारांना संपवायला निघाली आहे”, अशी टीका सुप्रिया सुळेंनी भाजपवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आमच्याकडे अजून कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा…’; डॉ नीलम गोऱ्हेंचा विरोधकांना टोला
-Baramati Lok Sabha | ‘भाजपच्या जे पोटात होतं ते ओठावर आलं’; सुप्रिया सुळेंचा भाजपवर पलटवार
-बारामतीच्या राजकारणात खळबळ; वंचितचे शिरुर लोकसभेचे उमेदवार मंगलदास बांदल फडणवीसांच्या भेटीला??