बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगल्याचं चित्र पहायला मिळत आहे. बारामती लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याची भाषा भाजपकडून करण्यात आली होती. भाजपकडून करण्यात आलेल्या या वक्तव्यावरुन सुप्रिया सुळे यांनी भाजपला धारेवर धरलं आहे.
भाजपचे केवळ एकच स्वप्न आहे, ते म्हणजे शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या संपवणे. तेच भाजपचं षडयंत्र आहे. भाजप पक्षाला वैचारिक विरोधक संपवायचा आहे. त्यामुळे ते लोकशाहीकडून दडपशाहीकडे हा देश घेऊन जात आहेत. बारामतीची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचे नेते एकवटले आहेत. आम्ही मात्र सत्याच्या मार्गाने बारामती लोकसभा जिंकू, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे या पुणे येथे माध्यमांशी बोलत होत्या.
“महाराष्ट्राचे लढवय्ये नेते शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या संपवायचं हे भाजप नेत्यांच्या तोंडून महाराष्ट्रासह अवघ्या देशांने ऐकलं आहे. बारामतीमध्ये येऊन चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना संपवायचं, अशी भाषा वापरली, हे भाजपच्या पोटातील ओठावर आले आहे. हे भाजप नेत्यांचे आणि चंद्रकांत पाटील यांचे षडयंत्र आहे”, आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीच्या राजकारणात खळबळ; वंचितचे शिरुर लोकसभेचे उमेदवार मंगलदास बांदल फडणवीसांच्या भेटीला??
-पुणेकरांनो सावधान! येत्या २ दिवस उष्णतेत वाढीची शक्यता; रात्री उकाड्यातही वाढ!
-भोसरीत आढळराव पाटलांची ताकद वाढली! विलास लांडे लागले प्रचाराला; नेमकं गणित जुळलं कसं?
-मोहोळांच्या प्रचारासाठी भाजपची फिल्डिंग! पक्षाचे १० हजार कार्यकर्ते पोहचणार १२ लाख नागरिकांपर्यंत