भोसरी : शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना रंगला आहे. आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी लोकसभेत क्षेत्रात येणाऱ्या ६ विधानसभा मतदारसंघात बैठकांचा धडाका लावला आहे. भोसरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. गेल्यावेळी प्रमाणे यंदाही भोसरीमधून विजयी मताधिक्य देण्याचा निर्धार स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
दरम्यान, पदाधिकारी बैठकीपूर्वी आढळराव पाटील यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास लांडे यांची भेट घेतली. विलास लांडे हे देखील लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. परंतु आढळराव पाटील यांना उमेदवारी देत पक्षाने मैदानात उतरवल्याने लांडे नाराज असल्याच दिसून आल. ते शरद पवार गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र अजित पवारांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी लोकसभेचा प्रचार सुरू केला आहे. लांडे यांच्या भेटीनंतर बोलताना “विलास लांडे हे कधीही नाराज नव्हते, कोणीतरी चुकीची माहिती पसरवत आहे” असं आढळराव पाटील यांनी सांगितलं आहे.
यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले, “विलास लांडे हे माझ्याप्रमाणे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते, त्यांचा विरोध वगैरे काहीही नव्हता. पक्षाने त्यांना मी उमेदवार असल्याचे सांगितल्यानंतर हा निर्णय त्यांनी मान्य केला. लांडे यांनी कधीही टोकाचा विरोध केला नाही, तुम्हाला उमेदवारी मिळाल्यास माझी हरकत राहणार नाही आपण मिळून काम करू, हे तिकीट जाहीर होण्यापूर्वी पासून ते मला सांगत होते. त्यामुळे कोणीतरी चुकीची माहिती पसरवत असून ते हे अजिबात नाराज नाहीत.”
महत्वाच्या बातम्या-
-मोहोळांच्या प्रचारासाठी भाजपची फिल्डिंग! पक्षाचे १० हजार कार्यकर्ते पोहचणार १२ लाख नागरिकांपर्यंत
-‘फडणवीस साहेब, इथं खरंच खूप त्रास होतोय’; अंकिता पाटलांनी फडणवीसांसमोर वाचला तक्रारींचा पाढा