पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी वैयक्तिक गाठीभेटींवर जोर दिला आहे. तर पक्ष संघटना म्हणून देखील शहर भाजपकडून विविध आघाड्या, मतदारसंघनिहाय तसेच प्रभागनिहाय बैठका देखील पार पडल्या आहेत. आता एकाच दिवसात मतदारसंघातील दहा ते बारा लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार नियोजन करण्यात आले असून १० हजार घरोघरी पोहचणार असल्याची माहिती शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे.
उद्या भाजपाचा 44 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे, या निमित्ताने ‘हर घर मोदी का परिवार’ हे संपर्क अभियान राबवले जाणार असून शहरातील १० हजार कार्यकर्ते १० लाखांच्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सर्व आमदार यांच्यासह १० हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार असल्याचे घाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे लोकसभा निवडणूक प्रभारी श्रीनाथ भिमाले, सरचिटणीस पुनीत जोशी, रवी साळेगावकर, राजू शिळमकर,राघवेंद्र बापू मानकर,संदीप खर्डेकर, अमोल कविटकर, हरीश परदेशी, पुष्कर तुळजापूरकर यांच्या सहभाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
घाटे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत ”अब की बार ४०० पार” ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार केला आहे, विधानसभा स्तरावर पक्षाच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांचे तसेच पन्ना प्रमुखांचे मेळावे या अभियानात आयोजित केले जाणार आहेत. मागील तीन निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेऊन यावेळच्या निवडणुकीसाठी मतदानाचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार आहे. या अभियानात प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. या अभियानात समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्य़ाचे लक्ष्य आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘फडणवीस साहेब, इथं खरंच खूप त्रास होतोय’; अंकिता पाटलांनी फडणवीसांसमोर वाचला तक्रारींचा पाढा
-Pune | बियर कंपनीने बुडवला ५७ कोटींचा राज्य सरकारचा कर; कंपनीवर गुन्हा दाखल