इंदापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज इंदापूर दौऱ्यावर होते. महायुतीच्या उमेदवार उपुमख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस हे इंदापूरकडे मेळाव्यासाठी जाताना वाट वाकडी करत इंदापूरचे ज्येष्ठ नेते आणि सोनाई परिवाराची प्रमुख दशरथ माने यांच्या घरी जाऊन भेट घेतली. दशरथ माने हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे मानले जातात.
गेल्या १० दिवसांपूर्वी शरद पवार यांची इंदापूरमध्ये सभा झाली होती, त्या सभेलाही दशरथ माने अनुपस्थित होते. दशरथ माने हे इंदापूरच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. ते स्वतः जिल्हा परिषदेला निवडून आले हेाते. तसेच त्यांचे चिरंजीव प्रवीण मानेही जिल्हा परिषदेत सभापती होते. सोनाई परिवाराच्या माध्यमातून त्यांनी दूध आणि गूळ व्यवसायात नावलौकिक मिळविला आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये भाजपचा मेळावा आयोजित केला आहे. सोनाई या दूधाचे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असणारे ब्रँड आहे. याच्याच माध्यमातून दशरथ माने यांनी अनेकांना रोजगाराची संधी दिली आहे. त्यामुळे इंदापूरच्या राजकारणातील महत्वाचे व्यक्ती म्हणून माने यांच्याकडे पाहिलं जातं.
दरम्यान, विधासभेचा निकाल ठरविण्यात माने यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. एकसंघ राष्ट्रवादीमध्ये दशरथ माने हे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते होते. पण राष्ट्रवादीच्या फूटीनंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. मात्र, इंदापुरात झालेल्या पवारांच्या सभेला माने पिता-पुत्रांनी दांडी मारली होती. त्यातच आता फडणवीसांनी त्यांच्या घरी भेट दिली त्यामुळे इंदापूरच्या राजकारणात नवा ट्वीस्ट आल्याचं दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune | बियर कंपनीने बुडवला ५७ कोटींचा राज्य सरकारचा कर; कंपनीवर गुन्हा दाखल
-Lok Sabha Election | उमेदवारानं मत मागण्यासाठी लढवली नवी शक्कल; वस्तारा हातात घेत म्हणाला,…
-प्रचार करावा तर असा…! तात्यांनी ससून रुग्णालयाला भेट दिले उंदराचे पिंजरे, सर्वत्र होतेय चर्चा
-सावधान! सूर्य आग ओकतोय, राज्यावर उष्माघाताचे संकट; ‘येथे‘ सर्वाधिक धोका