पुणे : परभणी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी महादेव जानकर यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी तगडा शिलेदार निवडणुकीच्या प्रचारात उतरवण्याच्या तयारीत आहे.
भूषणसिंह होळकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र त्यानंतर पवार आणि होळकर यांच्यातील संपर्क वाढला.येत्या शनिवारी होळकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शरद पवार यांचे नाव प्रमुख उपस्थितांमध्ये आहे. भूषणसिंह होळकर हे शरद पवारांच्या वतीने महाविकास आघाडीचा प्रचार करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. परभणीतून विद्यमान खासदार संजय जाधव पुन्हा रिंगणात उतरले आहेत.
महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीला खो देऊन परभणीची उमेदवारी मिळवली. महादेव जानकरांना महायुतीमधून उमेदवारी मिळाल्यानंतर धनगर मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. या सर्व राजकीयदृष्ट्या विचार करुन बारामती आणि माढ्याचा विचार लक्षात घेता भूषणसिंह होळकर यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करुन घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune | बियर कंपनीने बुडवला ५७ कोटींचा राज्य सरकारचा कर; कंपनीवर गुन्हा दाखल
-Lok Sabha Election | उमेदवारानं मत मागण्यासाठी लढवली नवी शक्कल; वस्तारा हातात घेत म्हणाला,…
-प्रचार करावा तर असा…! तात्यांनी ससून रुग्णालयाला भेट दिले उंदराचे पिंजरे, सर्वत्र होतेय चर्चा
-सावधान! सूर्य आग ओकतोय, राज्यावर उष्माघाताचे संकट; ‘येथे‘ सर्वाधिक धोका
-Election Commission इन ॲक्शन मोड! ओपिनियन आणि एक्झिट पोलबद्दल मोठा निर्णय