तमिळनाडू : लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. काहीच दिवसांत देशभरात लोकसभा निवडणुकांना सुरुवात होईल. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचार करताना दिसत आहेत. प्रचार करताना कोण काय आणि कसा प्रचार करेल हे सांगू शकत नाही. प्रचारासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते नवनवीन शक्कल लढवत असतात. अश्वासनं देत असतात. हे काही नविन नाही, मात्र तमिळनाडूमधील एका उमेदवाराने प्रचारावेळी चक्क हाती वस्तारा घेत थेट मतदाराची दाढी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
निवडणुकीच्या वातावरणात उमेदवार जनतेपर्यंत पोहचतात. दारोदारी जात, प्रचारसभा घेत, तसेच विविध प्रकारे मतदान करण्याचे आवाहन करतात. मतं मागतात. इतर वेळी ज्या नेत्यांना भेटण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा चकरा मारव्या लागतात निवडणुकीच्या वेळी हेच नेते सर्वसामान्य नागरिकांच्या दारी येत मतं मागतात. तमिळनाडूमधील अपक्ष उमेदवार रामेश्वरमध्ये आपला प्रचार करण्यासाठी वस्तारा हाती घेत मतदाराची दाढी केली आहे.
रामेश्वरमध्ये लोकसभेचे अपक्ष उमेदवार परिराजन, रामनाथपुरम एका सलूनमध्ये न्हावी म्हणून लोकांचे केस कापताना आणि दाढी करताना दिसत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा उमेदवार सलूनमध्ये आलेल्या लोकांची दाढी आणि कटिंग करत त्यांना चक्क हात जोडून आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहे. अपक्ष उमेदवाराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-प्रचार करावा तर असा…! तात्यांनी ससून रुग्णालयाला भेट दिले उंदराचे पिंजरे, सर्वत्र होतेय चर्चा
-सावधान! सूर्य आग ओकतोय, राज्यावर उष्माघाताचे संकट; ‘येथे‘ सर्वाधिक धोका
-Election Commission इन ॲक्शन मोड! ओपिनियन आणि एक्झिट पोलबद्दल मोठा निर्णय