पुणे : भाजपचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बोलता बोलता अनेकदा कॉलर उडवली आहे. त्यामुळे त्यांची या स्टाईलची सर्वतत्र चर्चा नेहमीच होत असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे यांच्यासारखी कॉलर उडवत त्यांना चॅलेंज दिल्याची चर्चा होती. त्यानंतर आज उदयनराजे यांनी पुन्हा कॉलर उडवली. उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका करणं टाळलं.
“शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार? ते वडीलधारे आहेत. माझ्या बारशात जेवलेल्या लोकांबद्दल मी काय बोलू? काय बोलणार?मला माझ्या एका मित्राने विचारलं, तुमची काय स्टाईल? मी म्हटलं, आपली काय स्टाईल? मी कुणाचं वाईट केलं नाही. लोकांच्या हिताचं काम केलं. माझ्यावर कॉलर उडवण्यावरुन टीका केली. कॉलर काढून घ्या किंवा काहीही काढून घ्या. पण लोकांचा जीव तुम्ही काढून घेऊ शकत नाही”, असं उदयनराजे म्हणाले आहेत. हे बोलतानाही त्यांनी पुन्हा एकदा कॉलर उडवली आहे.
“त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते माझ्याबद्दल विचार करत असतील की, जाऊदे बच्चा समजके छोड देंगे. असं ते जरी म्हणत असले तरी आता दुसरी बाजू अशी आहे, लहान होतो ते ठीक आहे, पण आता बच्चा राहिलेलो नाही. मला माझं कार्य केलं पाहिजे. त्यांनी त्यांचं कार्य केलं पाहिजे”, असं उदयनराजे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“हडपसरमधून आढळराव पाटलांना ५० हजारांचा लीड देणार”- नाना भानगिरे
-मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी भाजपचा ‘मेगाप्लॅन‘; असे पोहचणार १० ते १२ लाख नागरीकांपर्यंत
-निवडणूक आयोगाने घातल्या खर्चाच्या मर्यादा; प्रचारात उमेदवारांना महागड्या गाड्या वापरणं पडणार महागात
-‘काँग्रेसची गॅरंटी म्हणजे चायना मालासारखीच‘; भाजप नेत्याची खरमरीत टीका