पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला आहे. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली आहे. केशव उपाध्ये यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. “अनेक वर्षे देशाची सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने गरीबी हटाव सारखी अनेक आश्वासने दिली. मात्र यातले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. अशा काँग्रेसने ५ गोष्टींची दिलेली गॅरंटी ही चायना मेड वस्तूंसारखी आहे”, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.
“नक्कल करायलाही अक्कल लागते”
‘नक्कल करायलाही अक्कल लागते आणि ती अक्कल काँग्रेसकडे नाही, हे मोदी सरकारची नक्कल करून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाला दाखवून दिले. केवळ एका घराण्याच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या काँग्रेसच्या नव्या गॅरंटीमुळे आता देशातील जनता पुन्हा फसणार नाही, उलट देशाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या मोदी सरकारच्या पारड्यात प्रचंड बहुमताने सत्तेचे दान टाकेल’, असंही केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
“पंतप्रधान मोदी केवळ गॅरंटीच्या घोषणा करत नाहीत, तर गेल्या दहा वर्षांत त्यांनी दिलेली प्रत्येक गॅरंटी पूर्ण केल्याचे देशाने अनुभवले आहे. देशातील २५ कोटी लोकसंख्येच्या कपाळावरील दारिद्र्यरेषा मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे कायमची पुसली गेली असून जगाने याची दखल घेतली आहे. मोदी सरकारने जाहीर केलेला प्रत्येक संकल्प पूर्ण झाल्याचे चित्र देशाने पाहिले आहे. कलम ३७० रद्द करणे, राम मंदिर उभारणी, औद्योगिक विकास, रोजगाराच्या संधी, महिलांचे सक्षमीकरण, अशा प्रत्येक क्षेत्रातील मोदी की गॅरंटी खरी ठरते हे लक्षात आल्यावर आता त्यांच्या गँरंटीची नक्कल करत न्याय आणि विकासाच्या कागदी घोषणा करून काँग्रेस पुन्हा देशातील जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करत आहे”, असंही केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय! मग मुरलीधर अण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा’ – शिरोळे