पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक कुटुंबातील व्यक्ती या एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पहायला मिळालं आहे. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारं उदाहरण म्हणजे बारामतीमधील पवार कुटुंबातील खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात होणारी लढत. त्यातच रावेर लोकसभा निवडणुकीसाठी रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. रक्षा खडसे यांचे सासरे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे विरोधी पक्षात आहेत.
एकनाथ खडसे यांनी सूनबाईच्या विरोधात प्रचार करण्यास नकार दिला आहे. त्यांच्या या नकारावर आता खासदार सुप्रिया सुळे यांंनी भाष्य केलं आहे. पुण्यातील वीज दरवाढीविरोधात महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या आंदोलनात आज सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसेंच्या सूनबाई आणि भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात प्रचार न करण्याच्या एकनाथ खडसे यांच्या भूमिकेवर बोलताना त्या म्हणाल्या, ‘यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की कुठेतरी सुसंस्कृतपणा अद्याप बाकी आहे, असं म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
“पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील सर्व उमेदवार बहुमताने विजय होतील. आम्ही जेव्हा जिल्ह्यात फिरतो तेव्हा नागरिक महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराला कंटाळले आहेत. लोकांना केंद्रामध्ये बदल हवा आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये नागरिक या सरकारला धडा शिकवतील”, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-3
-‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय! मग मुरलीधर अण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा’ – शिरोळे
-प्रसाद ओकला करायचाय शरद पवारांवर बायोटेक; म्हणाला “शरद पवार महाराष्ट्रातील…”