पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारावेळी अनेक जण आपापल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे पुणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आणि कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना ट्रोल केले होते. त्यावर आता बारामतीच्या खासदार आणि लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच उत्तर दिलं आहे.
सुप्रिया सुळे या आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी वीज दरवाढी विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या आंदोलनाला हजेरी लावली आहे. यावेळी सुप्रिया सुळेंनी रवींद्र धंगेकर यांना केलेल्या ट्रोलवरुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबतच त्यांनी राज्याची परिस्थिती आणि दुष्काळावरदेखील भाष्य केलं आहे.
पुण्यातील पाॅवर हाऊस चाैकात राज्य सरकारने केलेल्या अन्यायकारक वीजदरवाढी विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात सहभागी झाले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. राज्य सरकारने एप्रिल महिन्यापासून वीज दरात अवाजवी दरवाढ केली आहे. अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या… pic.twitter.com/7jXcgmg60P
— Supriya Sule (@supriya_sule) April 4, 2024
‘विरोधकांनी रवींद्र धंगेकर यांना त्यांच्या शिक्षणावरुन ट्रोल केलं. असं ट्रोल करणं चांगलं नाही, मात्र रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजपला बोलायला काहीच नाही, म्हणून ते ट्रोल करत आहेत. लोकांना या देशांमध्ये बदल हवाय. भ्रष्टाचाराला लोक थकले आहेत आणि कंटाळले आहेत. बेरोजगारीला कंटाळले आहे. लोक महागाईला कंटाळले आहेत आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात, कामगारांच्या विरोधात महिलांच्या विरोधातील आहेत. त्यामुळे लोकांना आता बदल हवाय. हा बदल घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत’, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय! मग मुरलीधर अण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा’ – शिरोळे
-प्रसाद ओकला करायचाय शरद पवारांवर बायोटेक; म्हणाला “शरद पवार महाराष्ट्रातील…”