बारामती : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राज्यातील हायहोल्टेज लढत म्हणून बारामती लोकसभा निवडणुकीकडे पाहिलं जातं. या निवडणुकीसाठी महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या नणंद-भावजईच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांनी काही आठवड्यांपूर्वी ‘कुटुंबाने मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी एकटे पाडू नये, असं भावनिक आवाहन केलं होतं. त्यावर आता पवारांच्या काटेवाडीतील घरांवर लावलेल्या पाट्यांची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अजित पवारांना कुटुंबाने जर एकटं पाडलं असलं तरी काटेवाडीतील काही घरांमध्ये ‘दादा-वहिनी हे तुमचं कुटुंब, आम्हीच इथले उमेदवार’ अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत.
‘आम्ही जे आता बोर्ड लावलेले आहेत या मागचं कारण हेच आहे की, दादांनी या गावचा विकास पण केलेला आहे आणि दादांना असं एकटं पाडलं जात आहे. अजितदादा एकटेच आहेत आणि बाकीचे सर्व कुटुंब विरोधात आहेत तर ते चुकीचं ठरवण्यासाठी, दादांना साथ देण्यासाठी, हे काटेवाडीकर हे बारामतीकर हेच, आम्ही पण तुमच्या कुटुंबातले आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही हे बोर्ड बोर्ड लावलेले आहेत’, असं काटेवाडीतील गावकरी मिलिंद काटे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय! मग मुरलीधर अण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा’ – शिरोळे
-प्रसाद ओकला करायचाय शरद पवारांवर बायोटेक; म्हणाला “शरद पवार महाराष्ट्रातील…”
-पुण्यात पुलाचं काम सुरु असताना आढळला रणगाड्याचा बॉम्ब; संरक्षण विभागाकडून पाहणी सुरु