पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब आजमावत आहेत. तिन्ही उमेदवाराकडून जोरदार प्रचार केला जात असून यामध्ये मोहोळ यांनी आघाडी घेतल्याचं दिसत आहे. मोहोळ यांच्या सोबतीने आता भाजपची यंत्रणा देखील कामाला लागले असून ६ विधानसभा मतदारसंघातील आमदार, प्रमुख नेते यांच्याकडून बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.
शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी देखील आपल्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. काल मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ शिरोळे यांनी गोखलेनगर, निलज्योती हौसिंग सोसायटी लगत असलेल्या कुलदेवता व स्नेहसागर सोसायटीस भेट दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा मानला जातो. कारण गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत येथे भाजपला चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यंदाही हे मताधिक्य कायम राखण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडून मोर्चेबांधणी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-प्रसाद ओकला करायचाय शरद पवारांवर बायोटेक; म्हणाला “शरद पवार महाराष्ट्रातील…”
-पुण्यात पुलाचं काम सुरु असताना आढळला रणगाड्याचा बॉम्ब; संरक्षण विभागाकडून पाहणी सुरु