बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इतिहासात प्रथमच बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. महायुतीकडून सुनिता पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आता राज्य भाजपचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः भाजप कार्यकर्त्यांना रणनीती ठरवण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. उद्या इंदापूरमध्ये फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांनी भाजपसोबत महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पवार कुटुंबात मोठी फूट पडली आहे. आजवर बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्यासाठी जंगजंग पछाडणारे अजित पवार आता त्यांच्याच विरोधात उभे ठाकले आहेत. एवढेच नाही तर पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देत सुळे यांच्या विरोधात उभे करण्यात आलं आहे. अजित पवार यांना साथ देण्यासाठी भाजपकडून आपली यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे. सुरुवातीला नाराज असणारे इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांनी दूर केली. तर आता स्वतः फडणवीस हेच कार्यकर्त्यांना जाहीर मेळाव्याच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.
संकल्प 2024 संकल्प महविजयाचा म्हणत इंदापूर मधील जुनी मार्केट कमिटीच्या आवारात हा मेळावा पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-प्रसाद ओकला करायचाय शरद पवारांवर बायोटेक; म्हणाला “शरद पवार महाराष्ट्रातील…”
-पुण्यात पुलाचं काम सुरु असताना आढळला रणगाड्याचा बॉम्ब; संरक्षण विभागाकडून पाहणी सुरु
-Pune | पुणेकरांना कडाक्याच्या उन्हापासून मिळणार दिलासा; ‘या’ दिवशी पावसाचे संकेत