Nora Fatehi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री, उत्तम डान्सर नोरा फतेही ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगावं एक्प्रेस’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटात दिव्येंदू शर्मा, प्रतिक गांधी, अविनाश तिवारी, उपेंद्र लिमये, छाया कदम हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. याशिवाय या चित्रपटात ग्लॅमरस डान्सर, अभिनेत्री नोरा फतेही देखील झळकली आहे.
या चित्रपटामुळे सध्या नोरा फतेही पुन्हा चर्चेत आली आहे. ‘मडगांव एक्सप्रेस’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिव्येंदू, अविनाश आणि नोरा नुकतेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये बोलताना नोराने आपल्या करिअर लाईफबाबत खुलासा केला आहे. तिने तिच्या खडतर प्रवास मुंबईमधून कसा सुरु केला याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
“जेव्हा मी भारतात पहिल्यांदा आली तेव्हा माझ्या जवळ ५ हजार रुपये होते. यावेळेस मला १०० डॉलर म्हणजे किती असतात हे अजिबात माहित नव्हतं. मी एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. थ्री-बीएचके घर होतं. प्रत्येक रुममध्ये तीन मुली राहत होत्या, अशा एकूण ९ वेड्या मुलींबरोबर मी राहत होते. हे माझ्यासाठी ट्रॉमापेक्षा काही कमी नव्हतं. कधी कधी मला असं वाटायचं की, माझा भारतात येण्याचा निर्णय चुकीचा होता की काय”
करिअरसाठी मुंबईत आलेल्या नोराकडे तेव्हा संघर्षाच्या काळात फक्त ५ हजार रुपये होते. तेव्हा नोरा फक्त अंडी आणि ब्रेड खाऊन दिवस काढत होती. त्यातच तिला तिचं घरभाडे द्यावे लागत होते. नोरा ज्या एजन्सीमध्ये काम करत होती तेच पैसे ती देत होती. तिच्या पगारातून घराचे भाडे कट केले जात होते. त्यामुळे हातात येणारा पगार हा खूप कमी असायचा. त्या पगारात मुंबईसारख्या शहरात राहणं नोराला खूप कठिण होतं. अशी माहिती खुद्द नोराने दिली आहे.
नोराने तिच्या करिअरच्या सुरुवातीला हुक्का बारमध्ये काम केलं होतं, या काळातच नोराला डान्सची अधिक आवड निर्माण झाली आणि ती डान्स शिकली. नोरा फतेही आजही आपल्या डान्सने चाहत्यांना घायाळ करते. नोराने कधीच डान्स क्लासेस केले नाहीत. मात्र तरीही नोराच्या डान्सची बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि मलायका अरोरा या अभिनेत्रींसोबत केली जाते. नोरा जितका चांगला डान्स करते तितकीच ती सुंंदरही आहे.
नोरा फतेही फक्त ५ हजार रुपये घेऊन भारतात आली होती. आपल्या टॅलेंटच्या जोरावर तिने मनोरंजन विश्वात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. नोरा फतेही तिच्या करिअरच्या सुरुवातीला डान्स शिकवायची. डान्सर सोबतच नोरा फतेही एक उद्योजिका देखील आहे. ३२ वर्षीय नोरी फतेही काही दिवस एका मॉलमध्ये देखील काम करायची.
View this post on Instagram
नोरा फतेहीने अनेक सिनेमांमध्ये काम केले असले तरीही नोराला खरी ओळख ही तिच्या डान्समुळेच मिळाली आहे. नोरा ‘बिग बॉस सीझन ९’ आणि ‘झलक दिखला जा’ सारख्या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक राहिली आहे. तसंच ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातील ‘दिलबर’ या गाण्यानं तिनं अनेकांची मनं जिंकली आहेत.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
-Pune | पुणेकरांना कडाक्याच्या उन्हापासून मिळणार दिलासा; ‘या’ दिवशी पावसाचे संकेत