चंद्रपूर : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचार करताना दिसत आहेत. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार वनिता राऊत यांनी मतदारांना अनोखं आश्वासन दिलं आहे. फक्त श्रीमंतांनीच व्हिस्की आणि बिअर का प्यावी गरिबांना चांगली दारु का मिळू नये? असं म्हणत खासदार म्हणून निवडणून आल्यावर आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर देण्याचं आश्वासन चंद्रपूरच्या उमेदवार वनिता राऊत यांनी मतदारांना दिलं आहे.
वनिता राऊत यांनी खासदार म्हणून निवडून आल्यावर ‘गाव तिथे बियर बार’ सुरू करून बेरोजगारांना बिअर बारचे परवाने वितरीत करण्याचे आश्वासन दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या महिला उमेदवाराने खासदार निधीतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा केली आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात चर्चा आहे ती अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांच्या आश्वासनाचीच. विकास कार्याचे आश्वासन घेऊन नेते जनते समोर उभे होतात. याला वनिता राऊत अपवाद ठरल्या आहेत. ‘गाव तिथे बिअर बार उघडू’, ‘बेरोजगारांना बिअर बारचे परवाने देऊ’, असे आश्वासन वनिता राऊत देत आहेत.
वनिता राऊत अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार असून त्यांनी २०२१ मध्ये चिमूरमध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी देखील वनिता राऊत यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंद हटवणं आणि गाव तिथं दारू यामुळे वनिता राऊत या अनोख्या अश्वासनामुळे चर्चेत आल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
-Pune | पुणेकरांना कडाक्याच्या उन्हापासून मिळणार दिलासा; ‘या’ दिवशी पावसाचे संकेत
-‘विकासकामे करणे म्हणजे एक्टिंग करण्यासारखं नाही’; आढळराव पाटलांचा कोल्हेंवर निशाणा