पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने रात्री उशिरा आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. वंचित बहुजन आघाडीने आघाडीने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये अविनाश भोसिकर-नांदेड (लिंगायत), बाबासाहेब भुजंगराव उगले-परभणी (मराठा), अफ्सर खान-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) (मुस्लिम), वसंत मोरे-पुणे (मराठा), मंगलदास बांदल-शिरुर (मराठा), या ५ उमेदवारांची नावे या यादीत आहेत.
वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वंचित स्वतंत्र लढत असले तरीही त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे. सुप्रिया सुळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. pic.twitter.com/a1Gx2b9nKg
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 2, 2024
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
“बारामती लोकसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष– शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माझ्याविरुद्ध उमेदवार न देण्याची भूमिका घेत पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे मनापासून आभार मानते. आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण सदैव एकत्रित काम करु ही ग्वाही देते. पुन्हा एकदा धन्यवाद”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माझ्याविरुद्ध उमेदवार न देण्याची भूमिका घेत पाठिंबा जाहिर केला आहे. याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे…
— Supriya Sule (@supriya_sule) April 2, 2024
महत्वाच्या बातम्या-
-‘विकासकामे करणे म्हणजे एक्टिंग करण्यासारखं नाही’; आढळराव पाटलांचा कोल्हेंवर निशाणा
-Pune Lok Sabha Election | पुण्यात वसंत मोरे तर बारामतीत सुप्रिया सुळेंना राहिल पाठिंबा
-Big Breaking: अखेर तात्यांना ‘वंचित’कडून पुणे लोकसभेची उमेदवारी; मोहोळ, धंगेकरांपुढे मोठं आव्हान?
-Baramati Lok Sabha | ताई-वहिनींच्या लढतीत बेहनजींची एन्ट्री; बारामतीत देणार उमेदवार
-‘आम्ही दडपशाही नाही, लोकशाही माननारे, लोकशाहीत कोणाला संपविण्यासाठी आम्ही..’- सुप्रिया सुळे