पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर येताच वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचीदेखील भेट घेतली होती. पण काँग्रेसकडून पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. पुणे लोकसभा निवडणुकीत वेगळा प्रयोग करुन दाखवणार म्हणणाऱ्या वसंत मोरे यांना अखेर पुणे लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे.
आज अखेर वसंत मोरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं असून मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यातच वसंत मोरे यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षाच्या बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर पाठिंबा दिला असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या प्रसिद्धी पत्रकात लिहले आहे.
दरम्यान, वंचितच्या आजच्या यादीत पुण्यातून वसंत मोरे, नांदेमधून अविनाश बोसीकर, परभणीतून बाबासाहेब उगले आणि शिरुर मतदारसंघातून मंगलदास बागूल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमधून अफसार खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Baramati Lok Sabha | ताई-वहिनींच्या लढतीत बेहनजींची एन्ट्री; बारामतीत देणार उमेदवार
-‘आम्ही दडपशाही नाही, लोकशाही माननारे, लोकशाहीत कोणाला संपविण्यासाठी आम्ही..’- सुप्रिया सुळे
-“विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे” -मुरलीधर मोहोळ