पुणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना, “मोठ्या भावाची बायको ही आपल्या आईसमान असते. भाजपने आमच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत उतरवावे लागत आहे”, या टीकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी टीका केली आहे.
“आईला त्यांच्या विरोधात उभं केलं आहे तर आईला आशिर्वाद द्यावा मुलीने. आईने केलेले संस्कार असतात त्याची जपणूक करण्याची संधी प्राप्त झाली आहे. मला असं वाटतं त्यांनी जर पाठिंबा दिला तर निवडणूक क्लिअर होऊन जाईल. त्यांचं आईचं नात असेल तर खूप चांगलं आहे. थोड्या कारणास्तव दुरावली असली तरीही रक्ताची नाती एकत्र येत असतात. ही कायम अशीच राहोत. त्यामुळे त्यांनी आईला पाठिंबा द्यावा”, असं दीपक मानकर म्हणाले आहेत.
दरम्यान, बारामती मतदारसंघात पवार कुटुंबातील सदस्य एकमेकांविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राज्यातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत बारामती मतदारसंघाची निवडणूक अधिक चुरसीची होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: गुरवारी पाणी पुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेकडून आवाहन
-आचारसंहितेचा भंग होतोय? निवडणूक आयोगाने उचलले कठोर पाऊल! अशी नोंदवू शकता तक्रार
-जेजुरीकरांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा; मोठे कारण आले समोर…
-Shirur Lok Sabha | ‘खासदारसाहेब पाच वर्षे कुठे होता?’ अमोल कोल्हेंना मतदारांचा खरमरीत सवाल
-वडगावशेरीत मुळीक-मोहोळ-टिंगरे अन् पठारे एकाच मंचावर; महायुतीच्या मेळाव्यात महाविजयाचा निर्धार