पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक नवनवीन उपकरणे किंवा उयोजके म्हणजेच अॅप विकसित केले आहेत. नागरिकांचा निवडणुकांमध्ये सहभाग वाढावा या उद्देशावर निवडणूक आयोगाने भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सी-व्हिजील हे अॅप विकसित केले आहे. हे ॲप नागरिकांचा निवडणूक सहभाग वाढविण्यास उपयुक्त ठरत आहे. सी-व्हिजील ॲपवर जिल्ह्यात एकूण २७८ तक्रारी दाखल झाल्या आहेत आणि या तक्रारींवर कार्यवाही देखील पूर्ण झाली आहे.
देशाची लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठी एक जागरुक मतदाराची भूमिका अतिशय महत्वाची असते. त्यासाठी निवडणूक आयोगाने नागरिक मतदानापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नागरिकांचा सहभाग आणि लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे. आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन करण्यासाठी ‘सी-व्हिजील’ ॲप आयोगाने उपलब्ध करुन दिले आहे. हे ॲप म्हणजे नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सादर करण्यासाठी मिळालेले अत्यंत प्रभावी शस्त्र मानलं जात आहे.
निवडणुकीच्या प्रचारामध्ये मतासाठी रोख रक्कमेची लाच देणे, मोफत वस्तू वाटणे, मद्य वाटप, विहित वेळेनंतर ध्वनीवर्धकाचा वापर, प्रतिबंधित कालावधीत निवडणूक प्रचार आदी विविध स्वरुपाच्या आचारसंहिता भंग केली जाते. यबाबतच्या तक्रारी या ॲपद्वारे करता येतात. नागरिक आपली ओळख जाहीर न करताही तक्रार दाखल करु शकतात.
नागरिकांना निवडणूक प्रचारादरम्यान आचारसंहिता भंगाचे पुरावे म्हणून त्या घटनेचा व्हिडीओ, फोटो, ऑडिओ क्लीप अपलोड करावे लागते. नागरिक ज्या ठिकणाहून पुरावा म्हणून अपलोड करेल त्या ठिकणी जीपीएसद्वारे जिओ टॅग होते. आचारसंहिता भंगाच्या ठिकाणची जास्तीची माहिती देखील या अॅपद्वारे नागरीकांना भरता येणार आहे. यानंतर आचारसंहिता भंगाचे स्वरुप ड्रॉपडाऊन यादीतून निवडल्यानंतर संबंधित घटनेचे थोडक्यात वर्णन नमूद करणे आवश्यक आहे त्यानंतर नागरिकांनी केलेली तक्रार दाखल होण्यासाठी सबमिट या पर्यायावर क्लीक करावे.
सी-व्हिजील ॲपवर केलेली तक्रार सबमिट होताच सर्व संबंधित यंत्रणा गतीने कार्यवाही करते. भरारी पथकाला घटनेच्या ठिकाणी १५ मिनीटाच्या आत पोहोचणे बंधनकारक करण्यात आले आहे. तक्रार दाखल केल्यानंतर १०० मिनीटांच्या आत या तक्रारीवर कार्यवाही करुन त्याची माहिती तक्रारकर्त्याला पोहोचवली जाते. तक्रारकर्त्याची ओळख गुप्त राखण्यात येत असल्यामुळे त्याला संरक्षण प्राप्त होते हेदेखील या ॲपचे वैशिष्ट्य आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जेजुरीकरांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा; मोठे कारण आले समोर…
-Shirur Lok Sabha | ‘खासदारसाहेब पाच वर्षे कुठे होता?’ अमोल कोल्हेंना मतदारांचा खरमरीत सवाल
-वडगावशेरीत मुळीक-मोहोळ-टिंगरे अन् पठारे एकाच मंचावर; महायुतीच्या मेळाव्यात महाविजयाचा निर्धार
-Aarti Singh | आरती सिंगच्या घरी सुरुय लगीनघाई! आरतीचा ‘न्यु लूक’, इन्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस