पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा सामना होणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्हीही उमेदवारांकडून सुरुवातीच्या टप्यात वैयक्तिक गाठीभेटीवर भर देण्यात येत आहे. मोहोळ यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात आज मेळावा पार पडला. यावेळी महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमच्यासाठी फक्त ‘कमळ’ हाच उमेदवार असून मोहोळांना २०१९ पेक्षा जास्त लीड देणार असल्याचं विश्वास माजी आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.
“इतर राजकीय पक्षांप्रमाणे उमेदवारीसाठी आमच्यात देख स्पर्धा असते. परंतु पक्षाची उमेदवारी फक्त एकालाच मिळू शकते. परंतु उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मी काय किंवा मुरलीधरआण्णा मोहोळ काय आमच्या सर्वांसाठी फक्त कमळ हाच उमेदवार असतो. त्यांच्या विजयासाठीच सर्वजण मिळून प्रयत्न करत असून २०१९ च्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य देण्यासाठी पुढील सर्व दिवस कार्यरत राहू” असेही जगदीश मुळीक यांनी म्हंटल आहे.
दरम्यान, मेळाव्या वेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे म्हणाले की, “जनहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करणारा एक चांगला उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने आपल्याला आपल्या मिळालेला आहे. ते निवडून येतीलच, पण आता त्यांना जास्तीतजास्त मताधिक्य देणे ही माझ्यासह आपली सर्वांची जबाबदारी आहे”
वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, माजी आमदार बापूसाहेब पठारे, शिरूर पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जासुद, हवेली बाजार समितीचे माजी उपसभापती राजेद्र कंद, हवेली बाजार समितीचे संचालक नानासाहेब आबनावे, भाजपाचे तालुका अध्य़क्ष आबासाहेब सोनावणे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल पाचरणे, भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप सोनावणे, नगरसेवक राहुल भंडारे, सचिन पलांडे, रोहित खैरे, केशव पाचरणे, संतोष भरणे, सचिन सातपुते, अनिल नवले यांच्यासह श्रीगोंदा-पारनेर-हवेली तालुक्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात रहायला असलेले नागरीक, तरूण मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-Aarti Singh | आरती सिंगच्या घरी सुरुय लगीनघाई! आरतीचा ‘न्यु लूक’, इन्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस
-“शिवाजी महाराजांनी पहाटे दृष्टांत दिला! आता बारामती लोकसभा लढणार”- नामदेवराव जाधव
-…म्हणून भर पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी दाखवला जिवंत खेकडा