पुणे : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे लक्ष लागला आहे. एक बारामती तर दुसरी शिरूर लोकसभेची लढाई सध्या चर्चेचा विषय बनत आहे. शिरूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आढाव पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज चाकणमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांचा बैठक पार पडली. यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांनी ताकद लावत आढळराव पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केल आहे. पाटील यांच्यासह मंत्री उदय सामंत व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.
“पंधरा दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघाची बैठक पार पडली. त्यानंतर पुणे लोकसभेकरता विधानसभानिहाय बैठका पार पडल्या, त्यानंतर आज शिरूर लोकसभेसाठी बैठक पार पडली असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आपले उमेदवार विजयी करण्यासाठी ताकद लावण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले” असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.
दरम्यान, आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्यानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला, यावर बोलताना मिश्किल टिप्पणी करत “ग्रामीण भागात एका मुलाने कुटुंबातील सगळ्यांना न आवडणाऱ्या मुलींसोबत लग्न केले. परंतु नंतर सगळे तीला स्विकारतात. मग ती सून सगळ्यांची लाडकी सून होते” असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी आहे. आढळरावांच्या उमेदवारीवरुन निर्माण झालेली नाराजी लवकर दूर होईल” असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Aarti Singh | आरती सिंगच्या घरी सुरुय लगीनघाई! आरतीचा ‘न्यु लूक’, इन्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस
-“शिवाजी महाराजांनी पहाटे दृष्टांत दिला! आता बारामती लोकसभा लढणार”- नामदेवराव जाधव
-…म्हणून भर पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी दाखवला जिवंत खेकडा
-पुणेकरांना खूशखबर! आजपासून आंबा महोत्सव सुरु; थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करा हापूस