Aarti Singh : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि बीग बॉस १३ ची स्पर्धक प्रसिद्ध अभिनेत्री आरती सिंह ही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच आरतीने तिचा बॉयफ्रेंड दीपक चौहान सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आरतीने त्याला डेट करत असल्याचं तिने आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. त्यातच आता आरतीने आणखी एक खुशखबर दिली आहे. आरतीने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो पाहून तिच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाल्याचं दिसत आहे.
आरती सिंगने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंत आरतीच्या घरी फुलांची सजावट केल्याचं दिसत आहे. आरतीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच आरतीने साडीवर मॅचिंग असे लाल रंगाच्या बांगड्या आणि दागिने घातले आहेत. आरतीने केसात छान गजराही माळल्याचं दिसत आहे.
View this post on Instagram
आरतीच्या या पोस्टला ‘लाल इश्क’ असं कॅप्शन तिने दिलं असून तिचा नवा लूक पाहून चाहत्यांनी तिच्या पोस्टवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. अभिनेत्री तिचा प्रियकर दीपक चौहान सोबत २५ एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहे. आरतीच्या या पोस्टवर अनेकांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. सिनेकलाकरांनी तिला चाहते व सेलिब्रिटीही तिच्या या फोटोंवर कमेंट्स करत असल्याचं दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“शिवाजी महाराजांनी पहाटे दृष्टांत दिला! आता बारामती लोकसभा लढणार”- नामदेवराव जाधव
-…म्हणून भर पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी दाखवला जिवंत खेकडा
-पुणेकरांना खूशखबर! आजपासून आंबा महोत्सव सुरु; थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करा हापूस