पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात जवळपास अनेक जागांवर महायुती, महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी जोमाने प्रचार सुरु केला आहे. यावरुन राज्यातील चर्चेच्या मतदारसंघापैकी एक असलेल्या शिरुर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे यांच्यात पुन्हा एकदा लढत पहायला मिळणार आहे.
महायुतीकडून उमेदवारी मिळालेल्या आढळराव पाटलांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अमोल कोल्हे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अमोल कोल्हे हे दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या लग्नाला हजेर राहिले होते. त्यावेळी वधू-वरांना आशीर्वाद देताना अमोल कोल्हे यांनी राजकीय भाष्य केलं होतं.
अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवदी पक्षफुटीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. लग्नसोहळ्याला येण्यासाठी कोल्हे यांना उशीर झाला होता. हाच सदर्भ घेत वधू-वरांना आशीर्वाद देताना ‘घड्याळ निघून गेल्याने वेळ जुळत नाहीये. पण पण वधू-वराच्या आयुष्यात सुखाची-समाधानाची तुतारी वाजावी’, असं अमोल कोल्हे म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
“एखाद्याच्या लग्नाला जाऊन नम्रपणे त्यांना अभिवादन करावं. वधू-वरांना शुभेच्छा द्याव्यात. पण लग्नप्रसंगी जाऊन वाचाळवीरासारखं बरळायचं हे बरं वाटत नाही. येऊ शकतात”, असं म्हणत आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना फटकारलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोदीजींचे काम मतदारांपर्यंत पोहचवा! मोहोळांसाठी चंद्रकांत पाटलांच्या मॅरेथॉन बैठका
-बारामतीमध्ये रंगणार हायव्होल्टेज ड्रामा; सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा
-शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीचे शिलेदार केले जाहीर; पहा कोणाला कुठून मिळाली उमेदवारी
-राष्ट्रवादीच्या गोट्यातून रासपला परभणीची जागा; महादेव जानकरांची उमेदवारी जाहीर