पुणे : महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना महाविकास आघाडीने माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जागा दिली होती. मात्र आता महायुतीने पुन्हा एक मोठी खेळी केली आणि जानकरांना वापस आणलं. महादेव जानकर यांना महायुतीने एक जागा देऊ केली आहे. आता महादेव जानकर यांना हे आता महायुतीचे उमेदवार असणार आहेत. मात्र जानकर यांना परभणीमधून अधिकृत उमेदवार असणार आहेत.
आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकतीच महादेव जानकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीकडून राष्ट्रवादीच्या गोट्यातून परभणीची जागा सोडण्यात आली असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता परभणीमध्ये महादेव जानकर हे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
महादेव जानकर आणि त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्यात लढत होणार आहे. सुनील तटकरे यांनी महायुतीकडे ६ ते ७ जागा मागितल्या असल्याची माहिती तटकरेंनी दिली होती. राष्ट्रवादीकडून रायगडमध्ये सुनील तटकरे हे रिंगणात असणार आहेत.
महायुतीकडून बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित असणार आहे. दरम्यान, आजच शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीच्या निवडणुकीतून माघार घेण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे बारामतीच्या सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असून अजित पवारांची डोकेदुखी थांबली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून विजय शिवतारे यांनी बारामतीच्या निवडणुकीतून माघार घेतली; स्पष्टच सांगितलं काय घडलं
-रोहित पवारांनी अजितदादांना डिवचल; म्हणाले “बारामती लोकसभा मतदारसंघातील नेते…”
-अजित पवारांवर सडकून टीका करणारे शिवतारे तलवार म्यान करणार? पुरंदरमध्ये नेमकं काय घडणार