सासवड : राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या बारामती मतदारसंघातून मोठी राजकीय घडामोड आता समोर आली आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता त्यांनी बारामतीच्या निवडणुकीतून माघार घेतील आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
विजय शिवतारे यांनी बारामातीतून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची विजय शिवतारेंसोबत मुंबईत बैठक झाली त्यांची समजूत काढली. त्यानंतर शिवतारे बारामती निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का? याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु होती. मात्र आज सासवडमधील मेळाव्यामध्ये विजय शिवतारे यांनी आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे.
“मी महिलांसमोर उत्स्फूर्तपणे बोललो. ५ लाख ८० हजार पवार विरोधी मतं कोणाला जाणार, यासाठी मी तिसरा पर्याय या मतदारांसमोर ठेवला आणि ही लोकसभा निवडणूक लढायचीच ही घोषणा केली होती. आता कार्यकर्त्यांशी चर्चा केली, त्यांच्या तिखट प्रतिक्रिया ही उमटल्या. पण मी लढल्यावर काय होईल, यावर ही कारणमीमांसा झाली. पण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक झाली. मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नव्हतो, ते रागावले ही माझ्यावर. मला एक फोन ही आला, मुख्यमंत्री अडचणीत आहेत, त्यांना आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल. १५ ते २० लोकसभा उमेदवार पडू शकतात. असं मला सांगण्यात आलं. यामुळं महायुतीला मोठा फटका बसणार होता. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे”, असं विजय शिवतारे मेळाव्यात म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-रोहित पवारांनी अजितदादांना डिवचल; म्हणाले “बारामती लोकसभा मतदारसंघातील नेते…”
-अजित पवारांवर सडकून टीका करणारे शिवतारे तलवार म्यान करणार? पुरंदरमध्ये नेमकं काय घडणार
-सामान्य पुणेकर ते खेळाडू अन् चित्रपटसृष्टीतील अभिनेते; मुरलीधर मोहोळांना वाढता पाठिंबा
-‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो’; विजय शिवतारेंचा बारामती लोकसभेतून माघार?