पुणे : पुण्यासह देशभरात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. उन्हाळ्यात शरीराची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे. पुणे शहराच्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून दररोज पुण्याचे तापमान हे चाळीशी पार होत आहे. त्यामुळे पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत. येत्या काही दिवसांत पुण्याच्या तापमानात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता आहे. मार्चच्या अखेरीस उन्हाचा कडाका वाढल्याने उष्माघाताच्या समस्याही जाणवत आहेत.
भारतीय हवामान खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शिवाजीनगरचे तापमान २३.४ अंश सेल्सिअस असे नोंदवण्यात आले आहे. हे तापमान सरासरी प्रमाणापेक्षा ६.१ अंश सेल्सिअसने वाढले आहे. कोरेगाव पार्क, वडगाव शेरी भागात २६ ते २७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या जीवाची लाहीलाही होत आहे.
शहरात दिवसाच्या उन्हाच्या झळा आणि रात्रीच्या हवेतही उष्णता जाणवत आहे. ‘पुणे शहरात पुढील ७२ तास अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान आणि कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही’, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
पुणे शहरात सरासरी तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. २७ मार्च रोजी कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअस इतके होते. तर काल २९ मार्च रोजी पुण्यात कमाल तापमान ३९.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. मागील २४ तासांत तापमानात ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सामान्य पुणेकर ते खेळाडू अन् चित्रपटसृष्टीतील अभिनेते; मुरलीधर मोहोळांना वाढता पाठिंबा
-‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो’; विजय शिवतारेंचा बारामती लोकसभेतून माघार?
-Satara Lok Sabha Election | उदयनराजेंचं नाव घेताच शरद पवारांनी थाटात उडवली कॉलर
-पुणे तिथे काय उणे! ‘पाच वर्ष पक्ष सोडणार नाही, असं आश्वासन देणाऱ्यालाच मत’; पुण्यात झळकले बॅनर