बारामती : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. राज्यातील सर्वाधिक चर्चेच्या मतदारसंघात म्हणजेच बारामती मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
महायुतीमधील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी देखील बारामतीची निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. शिवतारेंच्या या घोषणेने अजित पवार यांची डोकेदुखी वाढली होती. शिवतारे यांनी बारामतीत भेटीगाठी वाढवून सभा घेऊन अजित पवारांवर जोरदार टीकांचं सत्र सुरु होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील वाकयुद्ध आता नरमल्याचं दिसत आहे. आज विजय शिवतारे यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधला आहे.
विजय शिवतारे काय म्हणाले?
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अडीच तास बैठक झाली. बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांच्या भावना या मी तिघांना कळवल्या. आता उद्या मी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी बैठक बोलावली आहे, या बैठकीमध्ये काय झालं त्याची सगळी माहिती उद्या मी कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहे. राजकारणात आम्ही स्वत:साठी नाहीतर जनतेसाठी लढत असतो. मी उद्याची बैठक करुन पुन्हा मुंबईला जाणार आहे”
“उद्या प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून त्यांचे मत काय आहे हे जाणून घेणार आहे. त्यांची मतं निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असतील हे जाणून घेणार आहे. गरज वाटली तर प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. जनतेचा आवाज बघून मी हे पाऊल उचललं होतं, त्यामुळे बारामती मतदारसंघातील हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, असं म्हणत शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणुकीतून युटर्न घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Satara Lok Sabha Election | उदयनराजेंचं नाव घेताच शरद पवारांनी थाटात उडवली कॉलर
-पुणे तिथे काय उणे! ‘पाच वर्ष पक्ष सोडणार नाही, असं आश्वासन देणाऱ्यालाच मत’; पुण्यात झळकले बॅनर
-“ही बैठक सकारात्मक, येत्या ३ दिवसांत निर्णय होईल”; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर मोरेंची प्रतिक्रया
-लोकसभा उमेदवारीवरून मोरे ‘वंचित‘ आता घेणार प्रकाश आंबेडरांची भेट