पुणे : मनसेमधून बाहेर पडल्यानंतर पुण्याची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असणारे वसंत मोरे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी मिळणार का? वसंत मोरे यांची पुणे लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा वंचितकडून पुर्ण होणार का? असे एकना अनेक प्रश्न उपस्थित होत होते. या सर्व राजकीय चर्चांवर आता वसंत मोरे यांनी प्रतक्रिया दिली आहे.
वसंत मोरे यांची प्रतिक्रिया
“प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठक सकारात्मक झाली. येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय होईल. तो निर्णय सर्वांना कळवला जाईल”, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा वारंवर बोलून दाखवला आहे. ‘मी लोकसभा निवडणूक लढणार आहे. आणि काहीही झालं तरी मी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं वसंत मोरे म्हणाले होते.
वसंत मोरे यांनी आज मुंबईत दादर येथील प्रकाश आंबेडकर यांच्या राजगृहात प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. मोरे हे वंचितकडून पुणे लोकसभेची निवडणूक लढवू इच्छित आहेत. त्यानंतर आता आंबेडकर यांच्या भेटीनंतर मोरेंना वंचितकडून उमेदवारी मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. येत्या ३१ मार्च किंवा १ एप्रिलपर्यंत स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभा उमेदवारीवरून मोरे ‘वंचित‘ आता घेणार प्रकाश आंबेडरांची भेट
-श्रीरंग बारणे यांच्या हाती पुन्हा धनुष्यबाण; पण ठाकरेंच्या मशालीला शमवणार का?
-मावळात अखेर श्रीरंग बारणेच! शिवसेनेकडून आठ उमेदवारांची यादी जाहीर
-निवडणूक आयोगाचा अजितदादांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीसाठी मिळणार नाही ‘घड्याळ’
-“मी बारामतीची निवडणूक लढणार मग दुसऱ्यांच्या घरात कशाला डोकावू?” सुप्रिया सुळेंचा खोचक टोला