पुणे : मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर माजी नगरसेवक वसंत मोरे हे कोणत्या पक्षात जाणार याबाबत अनेक चर्चा आहेत. मात्र अद्यापही वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. वसंत मोरे हे पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांनी महाविकास आघाडीत नेत्यांची भेट घेतली होती. वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेचे तिकीट मिळावे, यासाठी नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. गेल्या आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांची भेट घेतली आहे. मनसेत असतानाही त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा मोरेंनी बोलून दाखवली होती.
वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकर भेट घेणार असल्याने मोरे आता वंचित बहुजन आघाडीच्या दिशेने जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. लोकसभा निवडणूक लढवण्याची रणनीती आज पुण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मोरे आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-श्रीरंग बारणे यांच्या हाती पुन्हा धनुष्यबाण; पण ठाकरेंच्या मशालीला शमवणार का?
-मावळात अखेर श्रीरंग बारणेच! शिवसेनेकडून आठ उमेदवारांची यादी जाहीर
-निवडणूक आयोगाचा अजितदादांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीसाठी मिळणार नाही ‘घड्याळ’
-“मी बारामतीची निवडणूक लढणार मग दुसऱ्यांच्या घरात कशाला डोकावू?” सुप्रिया सुळेंचा खोचक टोला