पुणे : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काल महायुतीमधील शिंदे गटाच्या शिवसेनेने काल यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मावळ लोकसभेसाठी एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मावळ लोकसभा मतदासंघाच्या उमेदवारीबाबत मोठा होता सस्पेन्स आज संपला आहे. मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात लढत होणार आहे. श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. या आधी २०१४ आणि २०१९ ला त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढली आणि विजयही मिळवला होता. मात्र आताच्या निवडणुकीत चित्र काहीसं वेगळं आहे. कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटाचे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत.
श्रीरंग बारणे यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेससोबत होता. २०१४ ला दिवंगत लक्ष्मण जगताप आणि २०१९ ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी झाला होता. यामध्ये बारणे यांनी या दोन्ही निवडणुकीत बाजी मारली होती. आता मात्र ज्या पक्षप्रमुखांच्या नेतृत्वात दोन निवडणुका लढले आणि जिंकले त्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात ही निवडणूक असल्याने श्रीरंग बारणे यांच्या हाती पुन्हा धनुष्यबाण आले आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या मशालीला शमवणार का?, असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळात अखेर श्रीरंग बारणेच! शिवसेनेकडून आठ उमेदवारांची यादी जाहीर
-निवडणूक आयोगाचा अजितदादांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीसाठी मिळणार नाही ‘घड्याळ’
-“मी बारामतीची निवडणूक लढणार मग दुसऱ्यांच्या घरात कशाला डोकावू?” सुप्रिया सुळेंचा खोचक टोला
-आधी विरोध आता सुनील शेळकेंचा युटर्न! बारणेंच्या उमेदवारीवर घेतला मोठा निर्णय