पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीत तणावाची परिस्थिती पाहायला मिळत होती. स्थानिक भाजप नेत्यांकडून श्रीरंग बारणे यांनी कमळाच्या चिन्हावर लढण्याचा आग्रह धरण्यात येत होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस कडून बारणेंच्या उमेदवाराला विरोध होताना दिसून आला. मात्र अखेर महायुतीमध्ये ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडेच आली असून मावळ लोकसभा मतदारसंघासाठी श्रीरंग बारणे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
शिवसेनेकडून या आठ नेत्यांना लोकसभेची उमेदवारी
मुंबई दक्षिणमध्य – राहुल शेवाळे
कोल्हापूर- संजय मंडलिक
शिर्डी – सदाशिव लोखंडे
बुलढाणा – प्रतापराव जाधव
हिंगोली – हेमंत पाटील
मावळ – श्रीरंग बारणे
रामटेक – राजू पारवे
हातकणंगले – धैर्यशील माने
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी#Shivsena pic.twitter.com/PGgRhVMrhK
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) March 28, 2024
महत्वाच्या बातम्या-
-निवडणूक आयोगाचा अजितदादांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीसाठी मिळणार नाही ‘घड्याळ’
-“मी बारामतीची निवडणूक लढणार मग दुसऱ्यांच्या घरात कशाला डोकावू?” सुप्रिया सुळेंचा खोचक टोला
-आधी विरोध आता सुनील शेळकेंचा युटर्न! बारणेंच्या उमेदवारीवर घेतला मोठा निर्णय
-ओ ऽऽऽमोठ्ठया ताई… शिवतारेंचे बंड थंड होताच चित्रा वाघांनी सुळेंना डिवचलं