पुणे : लोकसभा निवडणुकीतमध्ये राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या बारामती लोकसभा निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीत बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून उमेदवारी निश्चित आहे. याबाबत फक्त अधिकृत घोषणा करणं बाकी आहे. त्यातच बारामतीमध्ये तुमच्या मनातील उमेदवार असेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नुकतेच पुण्यामध्ये केले होते.
“बारामतीमध्ये मी तिकिट मागितलं आहे. मी निवडणूक लढणार आहे. मग मी दुसऱ्यांच्या घरामध्ये कशाला डोकावू? अजितदादा माझ्यासाठी प्रचार करत होता तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला इतके कष्ट दिले नाहीत”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे.
“बारामती लोकसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून गेली १५ वर्षे मी काम करत आहे. मी ६ महिन्यांपूर्वीच तिकिटासाठी पक्षासह महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीकडे विनंती केली होती. माझ्या कामगिरीवरून तिकिट मिळेल याचा विश्वास आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“भारतीय जनता पक्षाला विकासासाठी नाही तर शरद पवार यांना संपविण्यासाठी निवडणूक लढवायची आहे. त्यांना बेरोजगारी हटवायची नाही, महागाई कमी करायची नाही. भाजप सूडाचे राजकारण करत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. माझ्या सगळ्यांशी गाठीभेटी होतात. त्यासाठी मला निवडणूक असण्याची गरज वाटत नाही. मी २४ तास आणि ३६५ दिवस लोकांमध्येच असते. मला ऊर्जा आणि आनंद लोकांमधूनच मिळतो”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आधी विरोध आता सुनील शेळकेंचा युटर्न! बारणेंच्या उमेदवारीवर घेतला मोठा निर्णय
-ओ ऽऽऽमोठ्ठया ताई… शिवतारेंचे बंड थंड होताच चित्रा वाघांनी सुळेंना डिवचलं
-पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! ठाकरे गटाने केली ‘ही’ मागणी; धंगेकरांचे टेन्शन वाढलं!