पुणे : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना पुणे लोकसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड आता समोर आली आहे. काँग्रेसचे कसबा आमदार रविंद्र धंगेकर यांना पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे काँग्रेसचे इच्छुक नेते नाराज आहेत. पक्षांतर्गत नाराजी अद्यापही दूर झालेली नसल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे.
पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जिंकण्याची आशा असतानाच स्वकियांकडूनच धोका असल्याचं लक्षात आलं. या प्रकरणाची गंभीर दखल आता केंद्र पातळीवरुन घेतली जाणार आहे. काँग्रेसकडून केंद्रातील विशेष पथक पुण्यासाठी पाठवण्यात आले आहे. या पथकाकडून पक्षांतर्गत नेत्यांवर लक्ष ठेवण्याची वेळ आता काँग्रेसवर आली आहे.
धंगेकरांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध पहायला मिळत आहे. काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागूल यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत काँग्रेस भवनमध्ये मूक निदर्शने केली. ते या बैठकीला उपस्थित नव्हते. एकीकडे पक्षांतर्गत विरोध आणि आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांची देखील नाराजी पाहून यामुळे धंगेकरांचे टेन्शन वाढले आहे.
काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे आमदार धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही प्रचारासाठी प्रमुख पदाधिकारी मनापासून एकत्र येत नसल्याचं दिसून आलं त्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरून याची दखल घेण्यात आली आहे.
काँग्रेसच्या या विशेष निरीक्षक पथकाकडून काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी कोणकोणत्या घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, याची माहिती गोळा करून ती केंद्र पातळीवर पाठवली जाणार आहे. त्यानंतर केंद्रीय पातळीवरून येणाऱ्या सूचनांनुसार स्थानिक पातळीवरील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना काम करावे लागणार असण्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आधी विरोध आता सुनील शेळकेंचा युटर्न! बारणेंच्या उमेदवारीवर घेतला मोठा निर्णय
-ओ ऽऽऽमोठ्ठया ताई… शिवतारेंचे बंड थंड होताच चित्रा वाघांनी सुळेंना डिवचलं
-पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! ठाकरे गटाने केली ‘ही’ मागणी; धंगेकरांचे टेन्शन वाढलं!
-Lok Sabha Election | “शिवसंस्कार हाच आमचा पिंड” म्हणत अमोल कोल्हे आढळराव पाटलांच्या पाया पडले