पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात शिवसेना नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर ठाम होते. शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला मात्र शिवतारे हे निवडणूक लढण्यावर ठाम होते. आता पुन्हा एकदा काल विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक पार पडली. पुरंदर तालुक्यातील विविध समस्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीतल्या नेत्यांमधील वाद आता जवळपास निवळला असल्याचं दिसत आहे.
#WATCH | Shiv Sena leader Vijay Shivtare met Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CMs Devendra Fadnavis & Ajit Pawar, in Mumbai. pic.twitter.com/NeQUtU0e7p
— ANI (@ANI) March 28, 2024
विजय शिवतारे हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका माध्यमांसमोर सविस्तरपणे मांडणार असल्याचं शिवतारे म्हणाले असल्याचंही बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीवेळी शिवसेना आमदार भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. या बैठकीमुळे बारामती लोकसभेतून शिवतारे माघार घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Lok Sabha Election | “शिवसंस्कार हाच आमचा पिंड” म्हणत अमोल कोल्हे आढळराव पाटलांच्या पाया पडले
-अखेर अदिती राव आणि सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात! तेलंगणामधील मंदिरात गुपचूप उरकला लग्नसोहळा
-वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा; मोरे बैठकीतून तडकाफडकी निघाले
-Pune Lok Sabha | मोहोळांची ताकद वाढली! मुरलीधर मोहोळांच्या पाठिशी आता संजय काकडेंचेही बळ