पुणे : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय नेते आपापल्या मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार करत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी करत आहेत. त्यात राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या लोकसभा मतदारसंघापैकी शिरुर लोकसभा मतदारसंघामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे.
अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यातील ही लढत प्रतिष्ठेची होणी आहे. याच दरम्यान अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळरावांची शिवनेरी गडावर भेट घडली. आढळराव पाटील हे समोर येताच अमोल कोल्हे यांनी हस्तांदोलन केलं आणि आढळरावांच्या पाया पडले आणि आशीर्वाद ही घेतले. दोघांनी शिरूर लोकसभेसाठी एकमेकांना शुभेच्छा ही दिल्याचं पाहायला मिळालं. दोघांसोबत त्यांचे कार्यकर्तेदेखील होते.
राजकारण हा पिंड नाही…
“शिवसंस्कार” हाच आमचा पिंड !#chatrapathishivajimaharaj #shivajimaharaj #amolkolhe #shivneri #junnar pic.twitter.com/XJdrVV2GA0— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 28, 2024
अमोल कोल्हे यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ‘राजकारण हा पिंड नाही “शिवसंस्कार” हाच आमचा पिंड’ असल्याचं म्हणत एकीकडे आढळराव पाटलाच्या पाया पडले आणि दुसरीकडे राजकारण पिंडावरुन कोल्हेंवर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. दरम्यान, अमोल कोल्हे यांनी राजकारण माझा पिंड नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यावर आता कोल्हे यांनी उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अखेर अदिती राव आणि सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात! तेलंगणामधील मंदिरात गुपचूप उरकला लग्नसोहळा
-वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा; मोरे बैठकीतून तडकाफडकी निघाले
-Pune Lok Sabha | मोहोळांची ताकद वाढली! मुरलीधर मोहोळांच्या पाठिशी आता संजय काकडेंचेही बळ
-बारामतीच्या राजकारणात मोठी घडामोड; सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार पुन्हा येणार एकत्र!