पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यामध्ये नामांकित वस्ताद आणि कुस्तीगीरांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना अजित पवारांनी पैलवानांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी मदतीचे आवाहन केले आहे. त्यातच मुरलीधर मोहोळ हे चांगल्या मतांनी निवडणून येतील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला आहे.
“पैलवानांची मदत आम्हाला पुणे जिल्ह्यातील चार ही लोकसभेत हवी आहे. मी काय फक्त बारामती, बारामती करायला आलेलो नाही. मी कोणत्याही स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेलं नाही. शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती अशा चार ही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे”, असं आवाहान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील पैलवानांच्या मेळाव्यात केलं आहे.
“मला बारामती लोकसभेतील पैलवानांची मदत घ्यायची आहे, असं मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. त्यासाठी आपण आज वस्ताद आणि पैलवानांचा मेळावा आयोजित केलाय. पैलवानांचा मोठा वारसा आपल्या राज्याला लाभलेला आहे. महाराष्ट्र केसरीच्या पातळीवर आपण हे अनुभवतो. कुस्तीच्या महासंघातील वादाचे पडसाद गल्ली ते दिल्लीपर्यंत पाहायला मिळाले. हे वाद आपल्याला मिटवायचे आहेत. त्यासाठीच आज आपण हितगुज साधत आहोत”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“तुमच्यातील एक सहकारी मुरलीधर यांच्या रुपाने लोकसभेत जाणार”
“आम्ही साधुसंत नाही. आम्ही राजकीय नेते आहोत. तुमच्या सहकार्याने आम्ही सरकार चालवतो. पैलवानांना ही प्रतिनिधित्व करता यावं, यासाठी आपण पुणे लोकसभेत मुरलीधर मोहोळांना उमेदवारी दिलेली आहे. तुमच्यातील एक सहकारी मुरलीधर मोहोळांच्या रूपाने लोकसभेत जाणार आहे. एकंदरीत कल पाहता मोहोळ मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, यात कोणतीही अडचण वाटत नाही”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा; मोरे बैठकीतून तडकाफडकी निघाले
-Pune Lok Sabha | मोहोळांची ताकद वाढली! मुरलीधर मोहोळांच्या पाठिशी आता संजय काकडेंचेही बळ
-बारामतीच्या राजकारणात मोठी घडामोड; सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार पुन्हा येणार एकत्र!
-उद्धव ठाकरेंनी जाहीर केली १७ उमेदवारांची यादी, कुणा-कुणाला संधी?