मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज लोकसभेसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण १७ जागांवरचे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोघ वाघेरे- पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सांगलीच्या जागेवरून काँग्रेस सोबत तिढा असताना देखील चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024
ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ वाशिम – संजय देशमुख
मावळ – संजोग वाघेरे पाटील
सांगली – चंद्रहार पाटील
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक – राजाभाऊ वाजे
रायगड – अनंत गीते
सिंधुदुर्ग रत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई ईशान्य – संजय दिना पाटील
मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई वायव्य – अमोल कीर्तीकर
परभणी – संजय जाधव
महत्वाच्या बातम्या-
-पुणे लोकसभेत वसंत मोरेंचा वेगळा प्रयोग?? मराठा समाजाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात?
-मावळची जागा शिवसेनेला तर बारामतीची राष्ट्रवादीलाच मिळणार; अजित पवारांचे स्पष्ट संकेत
-“अजित पवार यांना ताकद देण्यासाठी काम करेन”; पक्षप्रवेशानंतर आढळराव पाटलांची ग्वाही
-Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरने नकळत दिली प्रेमाची कबुली; ‘त्या’ फोटो पोस्टमुळे चर्चा