पुणे : मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करणाऱ्या पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी अद्याप कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केला नाही. महाविकास आघाजीकडून वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र पुण्याची जागा ही काँग्रेसकडे असल्याने काँग्रेस आमदारा रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच वसंत मोरेंना उमेदवारी मिळाली नाही. येत्या लोकसभा निवडणुकीत मराठा व्होट बँकेची ताकद दाखवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवा, असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना दिला होता.
प्रत्येक जिल्ह्यात गावपातळीवर चर्चा करुन एकाच उमेवाराची निवड करा. एकापेक्षा अधिक मराठा उमेदवार रिंगणात असल्यास मराठा मतांची विभागणी होईल. त्यामुळे आपापसात चर्चा करुन एकच मराठा उमेदवार रिंगणात उतरवा, असे मनोज जरांगे यांनी सांगितले होते. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मराठा आंदोलक कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवणार, याबाबत चर्चा सुरु असताना वसंत मोरे पुण्यातील मराठा आंदोलकांच्या संपर्कात आहेत.
महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने वसंत मोरे आता मराठा समाजाकडून पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वसंत मोरे यांनी यापूर्वी शरद पवार यांच्या भेटीनंतर एक सूचक वक्तव्य केले होते. पुणे लोकसभा निवडणुकीत यंदा वेगळा प्रयोग पाहायला मिळेल, असे वसंत मोरे म्हणाले होते. त्यानंतर आता वसंत मोरे मराठा समाजाच्या बैठकीला पोहोचल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे.
वसंत मोरे यांनी मंगळवारी पुण्यात पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवायची की नाही, यासाठी मराठा समाजाकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वसंत मोरे यांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान, वसंत मोरे यांनी ‘पुणे लोकसभा निवडणुकीत यंदा वेगळा प्रयोग होणार आणि आपण कोणत्याही परिस्थितीत पुणे लोकसभा लढवणारच’, असं ठाम मत व्यक्त केलं होतं. त्यातच आता वसंत मोरे मराठा समाजाची साथ घेऊन पुढे वाटचाल करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळची जागा शिवसेनेला तर बारामतीची राष्ट्रवादीलाच मिळणार; अजित पवारांचे स्पष्ट संकेत
-“अजित पवार यांना ताकद देण्यासाठी काम करेन”; पक्षप्रवेशानंतर आढळराव पाटलांची ग्वाही
-Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरने नकळत दिली प्रेमाची कबुली; ‘त्या’ फोटो पोस्टमुळे चर्चा
-‘ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक, जनता मोदींचे हात नक्कीच बळकट करेल’- मुरलीधर मोहोळ