पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याील नेते जोमाने तयारीला लागले आहेत. काही जागांवर अनेक राजकीय पक्षांचा जागावाटपाचा तिढा सुटला नाही. उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत. मात्र काही मतदारसंघामध्ये उमेदवारी घोषित होऊन प्रचारही सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळववारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते.
शिरुर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर अजित पवारांनी आढळराव पाटलांना शिरुरच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. यावेळी त्यांनी आढळरावांच्या प्रचाराचा नारळच फोडल्याचंही पहायला मिळालं आहे. शिरुरमधून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजेंची भूमिका करत त्यांचे कार्य घराघरात पोहचविले असा टेंभा मिरवणाऱ्या अमोल कोल्हेंनी महात्मा गांधींचा मारेकरी नथूराम गोडसे यांचीही भूमिका केली होती, हे पण सांगावं. अमोल कोल्हे आता डायलॉगबाजी करू लागले आहेत. पण ती नाटक, सिनेमात ठीक आहे, इथे निवडणूक असल्याने जनतेत ती चालणार नाही”, असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यावर शरसंधाण साधलं आहे.
“राजकारण हा आपला पिंड नसल्याने ते आपले काम नाही, असे सांगणारे आता निवडणुकीला का उभे राहिलेत? आढळराव पाटलांची ही घरवापसी आहे, आणि तुमचे पक्षांतर झालेले आहे”, असा टोलाही यावेळी अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-उद्धव ठाकरेंनी जाहीर केली १७ उमेदवारांची यादी, कुणा-कुणाला संधी?
-पुणे लोकसभेत वसंत मोरेंचा वेगळा प्रयोग?? मराठा समाजाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात?
-मावळची जागा शिवसेनेला तर बारामतीची राष्ट्रवादीलाच मिळणार; अजित पवारांचे स्पष्ट संकेत
-“अजित पवार यांना ताकद देण्यासाठी काम करेन”; पक्षप्रवेशानंतर आढळराव पाटलांची ग्वाही