पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. याबाबत अजित पवारांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा प्रचारही सुरु आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा बारामती मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार आहेत.
सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांचे कुटुंब सोडले तर संपूर्ण पवार कुटुंबाचा पाठिंबा आहे. अजित पवारांचे सख्खे भाऊ,वहिनी,पुतण्याही अजित पवार यांच्या विरोधात आहेत. त्यातच आता मंचर येथील पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर शरसंधाण साधलं आहे. बारामती मतदारसंघाबाबतही अजित पवारांनी भाष्य केलं.
मावळ लोकसभेवर युतीतील तिन्ही पक्षांनी दावा ठोकल्याने तेथील त्यांचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, तेथे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे तिकीट जवळपास नक्की आहे. फक्त त्यांच्या नावाची घोषणाच काय ती बाकी आहे. २८ तारखेला ती होणार आहे. शिवसेना मावळात, तर बारामतीत राष्ट्रवादी लढेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
शिरुरमधून तीनवेळा विजयी झालेले आणि ज्यांचा पराभव करताना तोंडाला फेस आला, ज्यांना रेटता आले नाही, असे शिवाजीराव आढळराव हे आता आपले उमेदवार असल्याने त्यांना विजयी करायचे आहे. एकतर्फी मतदान झाले पाहिजे. बुथनिहाय मतदान झाले पाहिजे, त्यासाठी भावकी बरोबर आहे का? हे बघा. कारण तिचा अनुभव स्वत: घेत आहे, असं म्हणत अजित पवारांनी पवार कुटुंब सोबत नसल्याची हळहळ व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“अजित पवार यांना ताकद देण्यासाठी काम करेन”; पक्षप्रवेशानंतर आढळराव पाटलांची ग्वाही
-Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरने नकळत दिली प्रेमाची कबुली; ‘त्या’ फोटो पोस्टमुळे चर्चा
-‘ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक, जनता मोदींचे हात नक्कीच बळकट करेल’- मुरलीधर मोहोळ