पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागतात. राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या लोकसभा मतदारसंघापैकी बारामतीनंतर नाव येत ते शिरुर मतदारसंघाचे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून खासदार अमोल कोल्हे हे निवडणूक लढणार आहेत. तसेच अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीकडून इच्छुक असणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंंतर बोलताना आढळराव पाटलांनी अजित पवाारांना ताकद देण्याची ग्वाही दिली आहे.
“तब्बल 20 वर्षांनंतर मी स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते, अतुल बेनके यांच्या खांद्याला खांदा लावून शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ताकद देण्यासाठी काम करेन”, अशी ग्वाही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे.
“मला बोलबच्चनगिरी, लबाडी व खोटा प्रचार करायला जमत नाही. लोकसभेतील १५ वर्षांची कामगिरी व मतदार संघातील जनसंपर्क जनतेने जवळून बघितला आहे. माझ्यामध्ये आणि आमदार दिलीप मोहितेंमध्ये कोणत्याही स्वरूपाचे वैयक्तिक मतभेद नाहीत. आमदार मोहिते चांगले राजकारणी आहेत. माझी राजकीय पार्श्वभूमी नाही, त्यामुळे मी तसा हाडाचा राजकारणी नाही. माझ्या राजकीय कारकिर्दीला भीमाशंकर कारखान्यापासून सुरुवात झाली होती. पुढच्या काळात थोडे मतभेद झाले आणि मी शिवसेनेत गेलो. मी ३ वेळा लोकसभेला निवडून गेलो”, असं आढळराव पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरने नकळत दिली प्रेमाची कबुली; ‘त्या’ फोटो पोस्टमुळे चर्चा
-‘ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक, जनता मोदींचे हात नक्कीच बळकट करेल’- मुरलीधर मोहोळ