पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होणार आहे. रवींद्र धंगेकर कसबा विधानसभेची निवडणूक जिंकून आमदार झाले. आता ते लोकसभेसाठी उभे आहेत. त्यामुळे ‘धंगेकर पॅटर्न’ लोकसभेसाठी चालणार का? याच्या चर्चा सुरू आहेत. याला मुरलीधर मोहोळ यांनी कसबा पोटनिवडणूक आणि पुणे लोकसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकांचा संदर्भ लावणे कसा चुकीचा आहे हे स्पष्ट करत, ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे हे अगदी सर्वसामान्य माणसाला कळतं”, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये लोकसभा निवडणुकीचे महत्व, देशाचे नेतृत्व कसे असावे, महायुतीचा उमेदवार निवडून येणे हे का आवश्यक आहे, त्यांचा दृष्टिकोनातून पुण्याच्या विकासाचे पुढील ५०-१०० वर्षांचे विकासाचे व्हीजन, केंद्र सरकारच्या माध्यमातून पुणे शहरासाठी झालेली कामे, इत्यादी गोष्टींबाबत भूमिका स्पष्ट केली.
प्रतिस्पर्धी उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीने धाकधूक वाढली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना मोहोळ म्हणाले की, अगदी सर्वसामान्य माणसाला, ज्याला या विषयात थोडं कळतं तो सुद्धा सांगेल की, एका विधानसभेची पोटनिवडणूक आणि लोकसभेची निवडणूक याचा एकमेकांशी संदर्भ लावण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ही निवडणूक देशाचे नेतृत्व कोणी केले पाहिजे?, देश कोणी चालवला पाहिजे?, कुठल्या नेतृत्वाच्या हातामध्ये देश सुरक्षित राहील?, कोणाच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होईल आणि देश पुढे जाईल? भारताला महासत्ताक देश म्हणून बनविण्याची क्षमता कोणामध्ये आहे? या सर्व गोष्टींचा विचार करूनच लोक मतदान करतात आणि करतील. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीसारख्या निवडणुकीचे संदर्भ कुठे लागू होत नसतात. लोकसभेची निवडणूक मोठी आहे आणि देशाचे भविष्य ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळे मला या गोष्टीचं काही वाटत नाही. मोदीजींना एक मत देण्याची संधी मला पुणेकर देतील याचा मला विश्वास आहे.
“पुणे या जगाच्या नकाशावरती स्वतःचं स्थान टिकवूंन आहे. पुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते पूर्णत्वाकडे नेणं, त्याच्यासाठीचा पाठपुरावा करणे, भूसंपादनाचा विषय असेल, राज्य सरकारची असतील किंवा तांत्रिकदृष्ट्या केंद्र सरकारकडून काही यासाठी समन्वय साधून त्या पूर्ण करणे, शिवाय पुण्यामध्ये आज मेट्रो यशस्वी झाली आहे. वनाज ते रामवाडी असा पुण्याचा पश्चिम ते पूर्व भाग जोडणारा मेट्रोमार्ग कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे लोक खुश आहेत. त्यामुळे मेट्रोचा अधिक विस्तार करणे, मार्ग वाढवणे ही काही केंद्र सरकारशी निगडीत महत्त्वाचे विषय आणि स्थानिक पातळीचे प्रश्न याला माझे प्राधान्य असेल”, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Lok Sabha Election | अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर; पुण्यात महत्वाची बैठक
-Summer | पुण्यात उष्णतेचा तडाका वाढला, पारा ४१ डिग्रीच्यावर; अशी घ्या काळजी