Shraddha Kapoor : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने कमी वेळात चांगलीच प्रसिद्धी झोतात आली. श्रद्धा अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये काम करुन चाहत्यांच्या मनावर छाप उमटवली आहे. आपल्या दमदार अभिनयाने श्रद्धाने प्रक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मात्र सध्या श्रद्धाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगत होत्या.
श्रद्धाचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून श्रद्धाच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. श्रद्धा सध्या तिच्या लव्ह-लाईफमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. श्रद्धा कपूर आणि पटकथाकार, लेखक राहुल मोदी रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. आता श्रद्धाने त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांना आता नातं जगापासून लपवून ठेवायचं नाही. दोघांनीही एकमेकांचा जोडीदार म्हणून स्वीकार केला आहे. श्रद्धा आणि राहुल दोघांच्याही घरी त्यांचं नातं मान्य आहे. सध्या दोघेही आपलं नातं आणखी पुढे घेऊन जाण्याचा विचार करत आहेत.
View this post on Instagram
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगला श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी एकत्र दिसून आले होते. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तेव्हापासून यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगू लागली. श्रद्धा कपूरच्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चर्चा आहे की तिनं आता तिचं रिलेशनशिप अधिकृत केलं आहे.
श्रद्धानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काल काही फोटो शेअर केले आहेत.हा फोटो शेअर करत श्रद्धानं “काही नाही, श्रृंडे आहे तर काही करु शकत नाही.” मात्र, या सगळ्यात श्रद्धाच्या लॉकेटनं लक्ष वेधलं आहे. त्याचं कारण म्हणजे त्या लॉकेटमध्ये ‘R’ हे अक्षर आहे.
‘तू झूठी मैं मक्कार’ या सिनेाच्या शूटिंगदरम्यान श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांची जवळीक वाढली. श्रद्धा आणि राहुलने अद्याप त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना अधिकृत माहिती दिलेली नाही. ‘तू झूठी मैं मक्कार’ या सिनेमाचं लेखन राहुल मोदीने केलं आहे. राहुल मोदी लोकप्रिय लेखन असून अनेक सिनेमांसाठी त्याने लेखन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक, जनता मोदींचे हात नक्कीच बळकट करेल’- मुरलीधर मोहोळ
-Lok Sabha Election | अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर; पुण्यात महत्वाची बैठक